Jalna Merchant Bank scam : जालना मर्चंट बँक घोटाळा; फिर्यादीच निघाला आरोपी

बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
Jalna Merchant Cooperative Bank scam
जालना मर्चंट बँक घोटाळा; फिर्यादीच निघाला आरोपीpudhari photo
Published on
Updated on

जालना ः जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची वेअर हाउसच्या नावे 177 बनावट खातेदारांच्या माध्यमातुन 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात फिर्याद देणारे बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांचा बँक फसवणुकीच्या गुन्ह्यात समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने फिर्यादी टोकशा यांनाच पोलिसांनी आरोपी केले आहे. पोलिसांनी टोकशा यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Jalna Merchant Cooperative Bank scam
Jalna merchant bank fraud : जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा आरोपी जेरबंद

जालना मर्चण्ट बँकेमध्ये अपहार झाल्याने तसेच अपहाराची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने गुन्ह्याची व्याप्ती बघून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सखोल तपास करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार संशयीत आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यास अटक केल्यानंतर त्याला मदत करणारे संशयीत निलेश्वर शेषराव भोसले (रार्. सिंदखेड राजा जि. बुलढाणा) 3) रामेश्वर विलासराव जाधव 4) ज्ञानेश्वर विलासराव जाधव 5) सुधाकर रावसाहेब ठोंबरे यांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीकडे केलेल्या तपासात व बॅकेचे शाखाधिकारी यांचे कडे केलेल्या तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व निष्पन्न तथ्याच्या आधारे गुन्हयातील फिर्यादी बँक महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा ( रा. मोदीखाना जालना ) याचा गुन्ह्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचे दिसुन आल्याने व तसे पुरावे पोलीसांना मिळाल्याने त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे चौकशीमध्ये इतरही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Jalna Merchant Cooperative Bank scam
Yashwant Bank Scam : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक

गुन्हयातील दोन्ही मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुंरगळ, निलेश्वर शेषराव भोसले, यांचे सह राजेंद्र भिकचंद टोकशा यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली आहे. आरोपीांकडे चौकशी चालु असुन इतर आरोपीतांची नावे निष्पन्न करुन त्यांचा शोध सुरू आहे.

सदर कामगीरी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल ,अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news