Jalna waste segregation : घनकचरा वर्गीकरण झाले सक्तीचे; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा वेगळा करा नसता दंडाला जावे लागणार सामोरे
Jalna waste segregation
Jalna waste segregationpudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहरात ओला व सुका कचऱ्यासह घातक कचरा वेगळा करूनच नागरिकांनी तो घंटा गाडीत टाकणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जालना शहरातील नागरिकांनी घरातून निर्माण होणारा कचरा चार स्वतंत्र प्रकारांत वर्गीकृत करून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे द्यावा. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष देखभाल व घातक कचरा यांचा समावेश आहे. कचरा मिसळून दिल्यास अथवा नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

Jalna waste segregation
Solid Waste Management Rules 2026 : कचरा वर्गीकरण सक्तीचे; ग्रा.पं. तींना आदेश

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे सुलभ होते. यामुळे लँडफिलमध्ये जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होते. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनते.

घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, बाजारपेठा, गृहसंकुले आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा संस्थांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रक्रिया यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे.

नियमांनुसार दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा ज्यांचे क्षेत्र 20 हजार स्के.मी आहे अथवा 40,000 लिटरपेक्षा जास्त पाणी वापर करणाऱ्या संस्थांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. जे निर्देशांचे पालन करणार नाहीत त्यांचे पाणी व वीज पुरवठा थांबविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 तसेच न्यायालयीन निर्देशांचे पालन करून स्वच्छ, निरोगी आणि प्रदूषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Jalna waste segregation
Pune Garbage Crisis: पुण्यात कचरा संकट गंभीर! प्रक्रिया प्रकल्प बंद; शहरात दररोज शेकडो टन अतिरिक्त कचरा

ओला कचऱ्यामधे स्वयंपाकघरातील अवशेष (भाज्यांचे देठ, पाने, साल), शिळे अन्न, फळांच्या साली व बिया, गवत, बागेतील कचरा, फुले व पाने, चहा व कॉफीचा चोथा, पशुखाद्य अवशेष तर सुका कचऱ्यामधे प्लास्टिक (बाटल्या, पिशव्या, खेळणी), कागद (वर्तमानपत्र, पुस्तके, पुठ्ठा), धातू (ॲल्युमिनियम, स्टील, लोखंड), काच (बाटल्या, तावदाने), लाकडी वस्तू (फर्निचर, बांबू), कापड व चामडे, जुने कपडे, शूज व इतर वस्तू तसेच सॅनिटरी पॅड, डायपर, फेस मास्क, बँडेज, सॅनिटरी वस्तू, पदार्थांचे अवशेष, घातक कचऱ्यांमधे बॅटऱ्या (मोबाईल, रिचार्जेबल), ट्यूबलाईट व बल्ब, पेंट, थिनर व रासायनिक पदार्थांचा समावेश आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण करा

जालना शहरात आगामी काळात घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार असून, प्रत्येक नागरिकाने घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सवय लावणे काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news