

डोणगांव (जालना) : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव परिसरामध्ये खरीप हंगामातील शेती पिकांची हजारो हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकामध्ये पाणीच-पाणी झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरवले आहे. यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.