

आप्पासाहेब खर्डेकर
जालना ः शहराच्या राजकीय इतिहासात 15 जानेवारी रोजी नवा अध्याय लिहिला जात आहे. जालना महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) रोजी मतदान पार पडले. परंतु निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक केंद्रात व्हीलचेअर पोहचल्या नाही. काही केंद्रात मनुष्यबळाअभावी वापरा विना तशाच पडून होत्या. याचा फटका वयोवृध्दा बसल्याचे बघालया मिळाले.
महानगरपालिकेच्या 16 प्रभागांतील 65 जागांसाठी ही निवडणूक होत असून, तब्बल 454 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी निवडणुक विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी तसेच मदराच्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नियोजन केले होते. शहरातील 291 मतदान केंद्रावरील 106 इमारतीत 106 व्हीलचेअर पुरविल्याचा दावा केला. परंतू प्रत्यक्षात मतदान केंद्रावर परिस्थिती वेगळी दिसून आली.
शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील सर सय्यद अहमद प्राथमिक शाळा रोहणवाडी रोड गांधीनगर येथील मतदान केंद्रावर दहा मतदान केंद्रे होते. या ठिकाणी प्रशासनाकडून वयोवृध्द व अपंगासाठी व्हीलचेअर, मतदान केंद्रात पायर्याऐवजी रॅम्प दिसून आले नाही.
यावेळी मतदान केंद्रात 73 वर्षीय मतदार सीताबाई मन्नालाल पिछाडे यांना कुंटूबातील दोन सदस्यांनी पकडून मतदान केंद्रात नेले. मतदान केंद्रात नेत असताना पायर्या चढणे अशक्य झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात तेथील एका मतदान केंद्राध्यक्ष यांच्याशी व्हीलचेअरविषयी विचारण केली असता, व्हीलचेअर मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच त्या ठिकाणी वयोवृध्द व्यक्तीला बसण्याची सुविधा नसल्याचे दिसून आले.
श्री सरस्वती मतदान केंद्रावर व्हीलचेअर तसेच वयोवृध्दांना कुणीही मदत करणारे नसल्याचे स्वतः मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. खरत मी वयोवृध्द तसेच अपंग आहे. सुविधा नसल्याने त्रास झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते.
जगदीश अग्निहोत्री
गांधी नगर भागातील मतदान केंद्रावर मतदानासाठी कुटुंबातील सदस्यांनी आणले होते. चालता येत नसल्याने त्यांनी सहारा दिला. गेटपासून ते मतदान केंद्रापर्यत चालत जाणे खूप अवघड झाले.
सीताबाई पिछाडे, वयोवृध्द