Jalna Firing News | कुंभारी येथे किरकोळ कारणातून गोळीबार! दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

गावठी कट्ट्या सह आरोपी पोलिसांनी केले अटक, तिघेजण फरार
घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील कुंभारी येथे पारधी समाजाच्या तरुणांनी किरकोळ वादावादी झाल्याच्या कारणावरून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र या उलट तरुणांना गावातील ग्रामस्थ व काही तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील तिघे जण फरार झाले तर दोघांना पकडून भोकरदन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरीक्त पोलिस अधिक्षक विक्रम साळी यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान गावातील अंकुश फकीरबा सहाने या तरुणाने गोळीबार करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण याला पकडून त्याच्या जवळील गावठी कट्टा प्रथम गावकऱ्यांच्या नंतर पोलिसांच्या कडे सुपूर्द केला.

भोकरदन हसनाबाद रस्त्यावर कुंभारी येथे संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान राजकुमार कांतीलाल भोसले व त्याचा साथीदार पृथ्वीराज संतोष चव्हाण दोघे राहणार वजीर खेडा हल्ली मुक्काम हसनाबाद यांच्यासह अन्य तिघेजण पृथ्वीराज याला मुलगा झाल्याच्या कारणावरून दिनांक तीन शुक्रवारी भोकरदन येथे पार्टीसाठी आले होते. येथे जेवण करून पार्टी करून ते संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजे दरम्यान हसनाबाद कडे वापस जात असताना त्यांनी रस्त्याने हुल्लडबाजी सुरु केली. ते दोन मोटारसायकल वरती रस्त्याने जात असताना कुंभारी येथे एक दोन जणांच्या अंगावर त्यांनी मोटरसायकल घातली व कट मारून ते पुढे गेले.

पोलिसांनी जप्त केलेले गावठी पिस्तूल घटनास्थळी पडलेली पुंगळी
पोलिसांनी जप्त केलेले गावठी पिस्तूल घटनास्थळी पडलेली पुंगळी

हा प्रकार पाहूना पाहून कुंभारी येथील काही ग्रामस्थ व तरुणांनी त्यांना रोखले यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. दरम्यान पुढे गेल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्या अन्य साथीदारांना घेऊन सुमारे एक तासानंतर शस्त्रासह कुंभारी येथे पुन्हा परत आले. व ज्या ग्रामस्थांनी व तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला गावात येऊन त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून हवेमध्ये पाच वेळा गोळीबार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ते काही शस्त्र घेऊन मोठा घातपात करण्याच्या तयारीने आले होते मात्र तेथे ग्रामस्थ व तरुणांनी त्यांना मोठ्या हिमतीने त्यांना पकडण्यासाठी पाठलाग केला असता त्या पाच तरुणांपैकी तिघेजण फरार झाले. दरम्यान पोलीस उपअधीक्षक डॉक्टर नितीन काटेकर यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात जाऊन आरोपींची तसेच कुंभारी येथील घटनास्थळाला फॉरेन्सिक टीम सह भेट दिली. गोळीबाराचे रिकामे काडतूस सह इतर पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news