

अबंड : अबंड तालुक्यातील शहागड येथे दि. 21 जानेवारी रोजी सकाळी एका नात्यातील मुलीचे अपहरण करत तिच्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.
संबधित पिडीत मुलगी शिक्षण घेत असून आरोपी हा फिर्यादी मुलीचे नातेवाईक असुन गेवराई येथे कॉलेजला जात असतांना शहागड बसस्थानका मध्ये उभी असतांना आरोपी महेश राजेंद्र काकडे, सोनु राजेंद्र काकडे, निमा साईनाथ काकडे, अश्वीनी सोनु काकडे सर्व रा. सारंगपूर ता. अंबड जि. जालना या सर्वांनी मुलीस फिरायला जायचे असे सांगितले. व बळजबरी कारमध्ये बसवले.
फिर्यादीनुसार बळजबरीने बसवुन आळंदी येथे घेवुन जात जिवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने लग्न केले याप्रकरणी मुलीच्या जबाब वरण गोंदी पोलीस ठाणे येथे 2026 कलम 137(2), 351(2),3(5) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल झालेले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कंटुले हे करीत आहेत.