Jalna crime news | कॅनरा बँकेतील बनावट सोने तारण, चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी पुण्यातून ताब्यात

२० दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अखेर बदनापूर पोलिसांची कारवाई
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

बदनापूर : कॅनरा बँकेतील बनावट सोने तारण व कोट्यवधींच्या सोने चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी संजय आसाराम डोंगरे याला मंगळावर दि. १२ रोजी तब्बल २० दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अखेर बदनापूर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय डोंगरे याने कॅनरा बँकेच्या लॉकरमधून अंदाजे साडेतीन कोटी रुपयांचे सोने चोरी करून फरार झाला होता. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

तांत्रिक तपास, गोपनीय माहिती व सततच्या पाठपुराव्यानंतर बदनापूर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरी केलेले संपूर्ण सोने कुठे आहे, तसेच बनावट तारण व्यवहाराचे नेमके जाळे किती मोठे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news