Jalna Accident : मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार कोसळली विहिरीत; दोन गंभीर, महिला कारमध्येच अडकली!

अपघातानंतर अडीच तास मदत न पोहोचल्याने संताप, अंधारामुळे मदतकार्यात अडथळे
अंधार पडल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते
अंधार पडल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते
Published on
Updated on

पारध प्रतिनिधी :- भोकरदन तालुक्यातील पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव मोटारसायकलस्वाराने कारला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र अनावधानाने वाहनावरील ताबा सुटल्याने धावडा येथील कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.

या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक महिला कारमध्येच अडकून पडली होती. रात्रीची वेळ आणि अंधारामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदतीचा प्रयत्न केला; मात्र आवश्यक यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने बचावकार्याला विलंब झाला.

धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर अडीच ते तीन तास उलटूनही रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचू शकले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. वेळेत मदत मिळाली असती तर अधिक प्रभावी बचावकार्य शक्य झाले असते, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

भोकरदन तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या या परिसरात अद्याप कायमस्वरूपी रुग्णवाहिका आणि अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका दुचाकीस्वाराचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात अखेर क्रेटा कारच विहिरीत कोसळली आणि निष्पाप प्रवाशांवर संकट ओढवले. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने या भागात कायमस्वरूपी आपत्कालीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news