जालना: तरुण व्यावसायिकावर गोळीबार करून ९५ हजारांची रोकड लुटली

Jalna Robbery Case | नागेवाडी जवळील घटना; दरोडेखोर पसार
Jalna Robbery Case
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी जवळ स्क्रॅप व्यापार्‍याची दुचाकी अडवून त्याच्याकडील 95 हजारांची रोकड लुटली. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी व्यापार्‍यावर गावठी पिस्तुलमधून गोळीबार केला. छातीत गोळी लागल्याने व्यापारी जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.३१) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. (Jalna Robbery Case)

चंदनझिरा भागातील स्क्रॅपचे व्यापारी शेख इम्रान शेख एजाज (वय 17) गुरुवारी चारचाकी ब्रेझा कार दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेले होते. तेथे कार दुरुस्ती केल्यानंतर त्याने दुरुस्तीचे 1 लाख 5 हजारांचे बिल जमा केले. कार घेऊन तो रात्री तो जालन्याकडे आला. त्याने कार नागेवाडी शिवारातील स्क्रॅपच्या गोदामात उभी केली. तेथून तो दुचाकीने जात असताना चंदनझिरा भागात नागेवाडी जवळ असलेल्या आई अमृततुल्य हॉटेलजवळ तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी त्याची दुचाकी अडवली.

यावेळी दरोडेखोरांनी इम्रान यास मारहाण करीत पैसे काढून देण्यास सांगितले. मात्र इम्रान याने दरोडेखोरांना प्रतिकार करीत पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यात आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी त्यातील एका दरोडेखोराने गावठी पिस्तूलातून एक गोळी इम्रान याच्या दिशेने झाडली. त्यानंतर तो खाली पडल्यानंतर त्याच्याजवळ असलेले 95 हजार रुपये हिसकावून घेत दरोडेखोरांनी पळ काढला.

इम्रान याच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून नातेवाईकांनी रात्रीच त्याला संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविले. दरम्यान, इम्रान याच्या छातीत गोळी अडकलेली असून शस्त्रक्रिया करून ती गोळी बाहेर काढावी लागणार असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, सहायक फौजदार सय्यद यांनी शुक्रवारी संभाजीनगर येथे जाऊन जखमी इम्रान याचा जवाब नोंदवला आहे. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमधे दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Jalna Robbery Case
जालना : अंबडला आढळला अकराव्या शतकातील मराठी शिलालेख !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news