Jalna fraud case : कंत्राटाचे आमिष देऊन जालन्यातील व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा

सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल
Jalna fraud case
Jalna fraud casepudhari photo
Published on
Updated on

जालना : युगांडातील सोलार कंत्राटाचे आमिष दाखवत जालना शहरातील एका व्यावसायिकाला 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

युगांडामध्ये सोलार स्ट्रीट लाईटचे मोठे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी लजपत परशुराम सचदेव (रा. एम.जी. रोड, जालना) यांनी सदर बाजार पोलिसांत तक्रार दिली आहे.

Jalna fraud case
Ratnagiri Fraud : तरुणीची पाऊण लाखांची फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन गंडा

आरोपी अरुण लक्ष्मण बोरीचा (मुंबई), अनुप शाक्य, रश्मी शाक्य आणि विक्रांत कुशवाहा (सर्व रा. उत्तर प्रदेश) यांनी कट रचून इलाईट जीके इन्फ्रा प्रा. लि. कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रे व गुगल मीटवर बैठका घेऊन विश्वास संपादन केला होता.

सुविधा शुल्क म्हणून 20 लाख रुपये उकळल्यानंतर आणि 500 नग सोलर स्ट्रीट पोल तयार करवून घेतल्यानंतर, त्यांनी मालाची उचल न करता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिस अधिक तपास करीत आहे.

Jalna fraud case
Pune Cyber Fraud Investment Scam: पुण्यात सायबर फसवणूक; गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 52 लाखांची फसवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news