Jalna theft case : घरफोडीतील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कदीम जालना पोलिसांची कारवाई; घरफोडीचे दोन गुन्हे होते दाखल
Jalna theft case
जालना ः आरोपीस कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला कदीम जालना पोलिसांच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

गांधी चमन परिसरात घरफोडीतील फरार आरोपी फिरत आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी फरार झालेला संशयित आरोपी तकदीरसिंग टिड्डुसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना) यास शुक्रवारी सकाळी गांधी चमन, जुना जालना परिसरात फिरत असताना ताब्यात घेतले. तकदीरसिंग यास तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले.

Jalna theft case
Jalna Crime : लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; खंजरसह एक जेरबंद

ही कारवाई कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जे. बी. शेवाळे, जमादार सचिन चौधरी, सदा राठोड, बाबा गायकवाड, मतीन शेख यांनी केली.

Jalna theft case
Crime News | 'सोलो ट्रिप' ठरली काळरात्र! नराधम टॅक्सी चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणी रात्रभर लपली जंगलात...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news