

Jalna Accident News: Overtaking bus hits car hard
शहागड, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या बसने कारला जोराची धडक दिली आहे. धडक जोराची बसल्याने कार रस्त्याल उलटली आहे. सुदैवानी कारमधील चौघे ही बचावले आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील वडीगोद्री गावाजवळील पुलाजवळ शुक्रवारी (दि. २४) रोजी घडली आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५२ वर शुक्रवारी (दि. २४) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगरकडे जात असलेले प्रवासी बस ही स्विफ्ट कार (एम एच २३ बी एच ००३०) ही संभाजीनगरकडे बसला ओव्हरटेक करीत असताना बसने धडक दिल्याने डिव्हईडर पलीकडे जात पलटी झाली. यामध्ये चार प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये दोन महिला, दोन पुरुषाचा समावेश होता.
वाहनाची वर्दळ कमी असल्याने ते थोडक्यात बचावले. शिफ्ट कारचालक व बस चालकांमध्ये बाचाबाची झाल्याने बस चालक बस मधील प्रवासी सोडून फरार झालेला होता. कार पलटी झाल्याने कारमधील प्रवासांना अक्षय मस्के, धाकलगाल येथील फिटर शेख या तरुणांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांना माहिती कळेपर्यंत वाहतूक सुरळीत केलेली होती. या अपघातात कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही.