Jalna Accident News : काळाचा थरकाप! ट्रकच्या धडकेत ९ वर्षांच्या मुलासह वडिलांनी गमावला जीव; दुसरा मुलगा मृत्यूशी झुंजतोय

जालना–देऊळगाव राजा मार्गावर भीषण अपघात
Jalna Accident News : काळाचा थरकाप! ट्रकच्या धडकेत ९ वर्षांच्या मुलासह वडिलांनी गमावला जीव; दुसरा मुलगा मृत्यूशी झुंजतोय
Published on
Updated on

जाफ्राबाद : जालना–देऊळगाव राजा मार्गावरील खामखेडा पाटीजवळ मंगळवारी (दि.१०) सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कुंभारझरी येथील विनोद उत्तम चव्हाण (वय ३४) व त्यांचा लहान मुलगा युवराज विनोद चव्हाण (वय ९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा शौर्य विनोद चव्हाण (वय ११) हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाफ्राबाद तालुक्यातील पूर्णा नदीजवळील खामखेडा पाटी परिसरात हा अपघात घडला. विनोद चव्हाण हे आपल्या दोन मुलांसह दुचाकीवरून जाफ्राबादहून जात असताना समोरून येणाऱ्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की विनोद चव्हाण व त्यांचा मुलगा युवराज यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या शौर्य चव्हाण याला तातडीने उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अपघातानंतर मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंबीय जाफ्राबाद येथून गौरीशंकर मंगल कार्यालय येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे कुंभारझरी परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news