Jalna accident | बदनापूर : ट्रेलरच्या चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू, दोघे जखमी

दुचाकीचा तोल गेल्यामुळे तिघेही खाली पडले, त्‍याचवेळी मागून आलेल्या ट्रेलरखाली एकजण सापडला
मृत कपूरचंद रामचंद गुसिंगे
मृत कपूरचंद रामचंद गुसिंगे
Published on
Updated on

बदनापूर : ट्रेलरच्या चाकाखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू तर दोघेजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव कपूरचंद रामचंद गुसिंगे (वय ६५ वर्ष) असून ते रा. राजेवाडी ता बदनापूर येथील रहिवासी होते. तसेच जखमी झालेले कप्पुसिंग शिवसिंग काकरवाल व चैनसिंग देवचंद काकरवाल हे देखील रा. राजेवाडी येथील आहेत

तिघेही जण आपल्या दुचाकी क्र. एमएच २० बीपी ४३८२ वरून जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गाने घराकडे जात असताना बदनापूर शहरातील ईदगाह मैदानाजवळ त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. त्यामुळे तिघेही खाली पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली कपूरचंद गुसिंगे आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित दोघे रस्त्याच्या कडेला पडल्याने ते जखमी झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर बदनापूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news