Jafrabad water crisis : पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा

पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
Jafrabad water crisis
डोणगाव ः येथील ग्रामपंचायत कार्यालय पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी केली. (छाया ः शेख फेरोज)
Published on
Updated on

डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे विदर्भातील सावखेडा भोई तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो.पाणी पुरवठयाची पाईपलाईन फुटल्यामुळे डोणगावचा पाणी पुरवठा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल रोजी संतप्त महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढुन रोष प्रकट केला.

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने गेल्या एक महिन्यापासुन गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.यामुळे नागरीकांना पाण्यासाठी दूर-दूर भटकंती करावी लागत आहे.पाणी टंचाईला कंटाळलेल्या संतप्त महिलांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी तातडीने पाणी पुरवठा सुरुळीत करण्यात यावा नसता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Jafrabad water crisis
Sangli News : पाणी संघर्ष समितीतर्फे महावितरणवर मोर्चा

यावेळी मोर्चेकऱ्यांशी ग्रामसेवक आर.आय. मोगल यांनी चर्चा करुन पाणी पुरवठा चार ते पाच दिवसात सुरुळीत करण्याचे आश्वासन दिले.

Jafrabad water crisis
Sangli News : पाणी संघर्ष समितीतर्फे महावितरणवर मोर्चा

पाणीटंचाई

डोणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ऊन तापू लागले असतानाच दुसरीकडे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे.यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्नावर महिला संतप्त झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news