

Infestation of various diseases on crops; 1 acre of chilli crop is planted and uprooted
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालक्यातील आन्वा परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली होती. सध्या मिरची पिकांवर विविध रोगाने हल्ला चढविला असून शेकडो हेक्टरवरील मिरची पिक शेतकऱ्यांनी उपटून टाकत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच मिरचीचे भाव कमी झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट असून मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईच्या मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
यावर्षी उशीरा पावसाचे आगमन झाले असून वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली आहे. मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्याने स्थितीत मिरची नाईलाजाने अनेक शेतकर्यानी मिरची पिक उपटून फेकली आहेत.
शेतकरी मिरची तोडणीसाठी मजुरांना शिल्लकीचे पैसे देऊन तरीहीं मजूर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या मिरची बाजारात तीन हजार रूपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.
भाव कमी असूनही तोडणी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नूकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत असूनही, मजुरांअभावी त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांची आर्थि स्थिती सुधारण्यास अडथळा येत आ यामुळे मिरची उत्पादक शेतक मेटाकुटीस आला आहे.
मजूर मिळेना
मिरचीची तोडणी आणि इतर कामांसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मजुरांअभावी, मिरचीची तोडणी वेळेवर होत नाही, ज्यामुळे मालाची गुणवत्ता घटते आणि नुकसान होण्याची शक्यता असते.. काही ठिकाणी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण मजुरांअभावी ती तोडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.