Rabi Season : वाढती थंडी रब्बी हंगामातील सर्वच पिकांसाठी ठरते पोषक

रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका पीक जोमात; शेतकरीवर्ग सुखावला
Rabi Season
Rabi Season : वाढती थंडी रब्बी हंगामातील सर्वच पिकांसाठी ठरते पोषकFile Photo
Published on
Updated on

Increasing cold spell is beneficial for all crops in the Rabi season

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणातील थंडी कमी झाली होती. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अस-लेली थंडी पुरेशा प्रमाणात पडत नसल्याने गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका उत्पादन शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत असतानाच आता वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने रब्बी हंगामातील पिके घेतलेला शेतकरीवर्ग सुखावला आहे.

Rabi Season
Jalna News : आज मतदार ठरवणार पालिकेच्या शिलेदारांचे भवितव्य; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी

दरम्यान थंडीमुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण मिळत आहे. कारण थंडीमुळे पिकांच्या वाढीला चालना - मिळते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे गहू, हरभरा आणि ज्वारी यांसारखी पिके बहरतात. - यामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते आणि पिके चांगल्या प्रकारे तग धरत आहेत.

तालुक्यातील अनेक शेतकरी वर्गाच्या खरीप हंगामातील उत्पादन मोठी घट झाली होती. यानंतर शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांपासून उत्पादन घेण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिना सुरू होऊनही देखील, रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता. मात्र, नोव्हेंबरच्या शेवट्या दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाणात वाढ होत असल्याने, शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांसाठी आशावादी बनत आहेत. तालुक्यात हरभरा, गहू व अन्य पिके बहरली आहे.

Rabi Season
दोन एकरांत तब्बल ३ लाखांचे उत्पन्न, डोंगराळ शेतात फुलवली पपईची बाग

पारा घटतोय

मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा घटत आहे. गार वाऱ्यामुळे तालुक्यात गारठा वाढला असून, वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे. पहाटे पासूनच कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हामध्येही गारव्याची झुळूक दिसते.

पिकांना लाभदायक

या वर्षी रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडले की नाही? याबाबत धास्ती शेतकरी वर्गाला वाटत होती. मात्र आता पिकांना लाभदायक असलेल्या थंडीस सुरुवात झाल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिके सुस्थितीत येतील, अशी आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news