illegal liquor raid : राज्य उत्पादन विभागाने पकडली अवैध दारू

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे कारवाई
illegal liquor raid
जालना ः घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने अवैध दारूवर कारवाई करून पकडलेल्या दारूसह आरोपी. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 1 लाख 84 हजार 250 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.

जालना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे परराज्यातील अवैधरीत्या मद्याची विक्री करणाऱ्या विरोधात कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.

illegal liquor raid
TWJ financial scam : टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांना घातला तब्बल 4.33 कोटींचा गंडा

राणी उंचेगाव येथे पत्र्याच्या शेडमधे एक इसम गोवा राज्यातील निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला मद्यसाठा महसूल बुडून अवैधरीत्या बाळगून अवैधरीत्या विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा टाकला.

पत्र्याच्या शेडमध्ये गोवा राज्यात निर्मिती व विक्रीकरिता असलेल्या 16 हजार 200 रुपयांची डॉ.डि.ए.एन चॉईस माल्ट विस्कीच्या 108 सीलबंद बाटल्या, 36 हजार 250 रुपयांच्या रॉयल स्टॅग व्हीस्की च्या 145 सीलबंद दारू बाटल्या, 21 हजार 200 रुपयांच्या ईम्पीरील ब्लू व्हिस्कीच्या 96 सीलबंद दारू बाटल्या, 10 हजार 560 रुपयांच्या मॅकडॉल नं 1 व्हिस्कीच्या 48 सीलबंद दारू बाटल्या, 69 हजार 120 रुपयांच्या देशी दारू सखु संत्राच्या 864 बाटल्या, 6 हजार रुपयांच्या ईम्पीरील ब्लू व्हिस्की व रॉयल स्टेंट विस्कीच्या रिकाम्या बाटल्या,25 हजारांचा मोटोरोला कंपनीचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

illegal liquor raid
Minor girl name caste correction case : शाळेच्या रेकॉर्डवर आईची जात लावण्याचे आदेश

ढाब्यावर अवैध दारू

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरालगतच्या ढाब्यासह ग्रामीण भागातील ढाबेही तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक ढाब्यांवर अवैध दारू विक्री होत असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news