Illegal Fertilizer Stock : बेकायदेशीर खताचा साठा पकडला

जालना शहरात कारवाई : १८ लाख ७ हजार रुपयांचे खत जप्त
Fertilizer News
Illegal Fertilizer Stock : बेकायदेशीर खताचा साठा पकडलाPudhari Photo
Published on
Updated on

Illegal Fertilizer Stock Seized

जालना, पुढारी वृत्तसेवा जालन्यातील नवीन मोंढा परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकुन डीएपी, कडुनिंब वेष्टित युरिया, पोटॅश, जैव खते यांसह विविध प्रकारच्या खतांचा १८ लाख ७ हजार १८४ रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या या कारवाईमुळे खत विक्रेत्यांमधे खळबळ उडाली आहे.

Fertilizer News
Fertilizers Black-Marketing : खताचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विभागीय आणि जिल्हा भरारी पथकाने नवीन मोंढा भागातील एपीएमसी मार्केटमधील गाळा क्रमांक एस.टी. २६ येथे छापा टाकला. यावेळी एका ट्रकमधून (एमएच. २३ एआर २४००) खताच्या गोण्या उतरवल्या जात असल्याचे आढळून आले. पथकाने चौकशी केली असता संबंधित गाळ्याचा कोणत्याही अधिकृत परवान्यात उल्लेख नसल्याचे समोर आले. खत साठ्याबाबत दुकान चालकाकडे पथकाने माहीती विचारली असता त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही.

पथकाने गोदामाची तपासणी केली असता, डीएपी, कडुनिंब वेष्टित युरिया, झिंक विरघळणारे जैवखत, पोटॅशसह तब्बल १२ प्रकारच्या खतांच्या १७६२ गोण्या आढळून आल्या. या खतसाठ्याची किंमत १८ लाख ७ हजार १८४ रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Fertilizer News
Subsidized fertilizer scam : 21 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित;3 रद्द!

संशयित खतांमधून १३ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, संपूर्ण गोदाम सील करण्यात आले आहे. जालना शहरासह जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा मोठा डाव कृषी विभागाने केलेलल्या कारवाईमुळे उधळून लावला गेला आहे.

या प्रकरणी दोन मुख्य आर- ोपींसह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय भरारी पथक प्रमुख आशिष काळुशे, श्रीकृष्ण बंडगर तसेच जिल्हा भरारी पथक प्रमुख निलेशकुमार भदाणे, महादेव काटे यांच्या पथकाने केली.

जालना शहरात खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर खत विक्रेत्यांमधे खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news