Jalna Crime News : विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा !

व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Harassment of a married woman; case registered against husband and five in-laws!

जालना, पुढारी वृत्तसेवाः व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात पती भरत नगरकर यांच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Jalna News : राष्ट्रीय महामार्गावर दोनवेळा मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

फिर्यादी सारीका भरत नगरकर (वय ३२, सध्या रा. काद्राबाद, जालना; मूळ रा. अमरावती) यांचा विवाह २०११ मध्ये अमरावती येथील भरत नगरकर यांच्याशी झाला होता. लसानंतर काही वर्षांतच पतीने चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच माहेरून कटिंगच्या व्यवसायासाठी २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत पीडितेला शिवीगाळ व चापटबुक्क्यांनी मारहाण केली.

या छळात सासू शोभा नगरकर व सासरे गजानन नगरकर यांनीही साथ देत पैसे न आणल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तर नणंद सारिका मगावकर (सिल्लोड) व दीपाली बेरळीकर (गंगाखेड) यांनी माहेरी येऊन भावाला मारहाणीसाठी चिथावणी दिली.

Crime News
Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात ८४ हजार ४१६ महिलांचे अनुदान बंद !

या सततच्या त्रासाला कंटाळून पीडिता जालन्यात माहेरी निघून आली. सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस शिपाई विलास पवार पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news