Road Accident | गुडेवाडी ( पाथरवला खू) येथील पाहुण्याच्या लग्नाला आलेल्या दोन दांपत्यापैकी पती-पत्नी मुलगा जागीच ठार

दुसरे दांपत्य पती-पत्नी-मुलगा गंभीर
Road Accident
गुडेवाडी ( पाथरवला खू) येथील पाहुण्याच्या लग्नाला आलेल्या दोन दांपत्यापैकी पती-पत्नी मुलगा जागीच ठार File Photo
Published on
Updated on

शहागड : अंबड तालुक्यातील गहिनीनाथ नगर जवळील पेट्रोल पंपा समोर गुंठेवाडी येथील पाहुणे आसलेले ढवळे यांच्या वऱ्हाडी मंडळी म्हणून लग्नासाठी आलेल्या सिमा संतोष बनसोडे वय 40 वर्ष, पती संतोष बनसोडे वय 45 वर्ष व मुलगा वय पाच वर्ष हे तिघे रा. वळदगाव वाळूज छ.संभाजी नगर हे नातेवाईक असलेल्या ढवळे रा.गुठेवांडी (पाथरवाला खू) यांच्या मुलांच्या लग्नासाठी उमापुर येथील माटेगाव येथील लग्न लावून परत येत असतांना सोमवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास कटंनेर क्र. एन.एल.01. जी. 9322 ने दुचाकी क्र.एम.एच‌.20.एच.सी.3013 होंडा शाईनवरील पाठीमागून जोराची धडक दिली.

हि दुचाकी कंटेनरच्या खूप जवळ असल्याने दुचाकी कटंनेरच्या चाकाखाली आल्याने या मधील चालक दुचाकीस्वार पती-पत्नी व लहान मुलगा जागीच ठार झालेले असून त्यांच्या सोबत चालत आसलेले दुसऱ्या दुचाकीवरील नातेवाईक पती- पत्नी - मुलगा दुचाकी क्र. एम.एच.16 सी‌.एल.9737 हिरो स्प्लेंडर ला हि धडक बसल्याने ते डिव्हायडर जाऊन पडले यामध्यिल रोहिलगड येथे राहत असलेले व हल्ली मुक्काम चिकलठाणा येथील विकास अण्णासाहेब जाधव वय 25 वर्ष ,साक्षी जाधव गरोदर वय 20, मुलगा अर्थ विकास जाधव, हे तिघे हि गंभीर जखमी असून त्यांना छ.संभाजीनगर येथे डॉ. सुकुंडे यांच्या रुग्णवाहिकेने पाठवण्यात आलेले असून मयतास 102 या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या एन.एच‌.आय. या रुग्णवाहिकेने पाचोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले असून अपघात झाल्या नतंर कंटेनर चालक फरार झालेला होता. याला महाकाळा येथील नागरिकांनी पकडून ठेवले होते तर कंटेनर राष्ट्रीय महामार्ग 52 वर असल्याने अर्धा तास ट्राफिक जाम झालेली होती.

गोदी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सरकारी वाहनाने धाव घेतली यामध्ये उपनिरीक्षक किरण हावले, जमादार रामदास केंद्रे,पो.का.दिपक, प्रदिप हावळे, भोजने, वहाब शेख, सचिन गायकवाड यांनी वाहन राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला काढून ट्राफिक सुरळीत करत जखमींना व मयतास रुग्णवाहिकने दवाखान्यात हलवले यावेळी महाकाळा येथिल नागरिक सुशांत पटेकर, अशोक पाळीक, महादेव लहाने, अंबादास सिरसाट, भाऊसाहेब दगडफोडे यांनी मदत करत रुग्णवाहिका व मयतास रुग्णवाहिकने दवाखान्यात पाठवले यावेळी कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता त्यांचे नाव आंधळे रा.गुळज जि.बीड असल्याचे कळाले.

Road Accident
Jalna Crime News | शहागड तहसीलदारांची मोठी कारवाई : गोदावरी नदी पात्रात धाड टाकून ३१ वाळू तस्करांना अटक

राष्ट्रीय महामार्ग 52 च्या एन‌एचआयची ची रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. यामुळे खाजगी रुग्णवाहिकेला त्यांना फोन करावा लागला. तसेच 108 वडीगोद्री येथील येथील रुग्णवाहिका आलेली नव्हती.

Road Accident
Jalna Unseasonal Rain | शहागडला २ दिवसांपासून अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडून गेले

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मोटरसायकलचा कंटेनेरने चुरडा केलेला होता तर मृत लहान मुलांना पाहून माका येथील नागरिकांचे मन हळहळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news