Jalna News : गट प्रवर्तक, आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शन

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन, घोषणाबाजीने दुमदुमला परिसर
Jalna News
Jalna News : गट प्रवर्तक, आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शन File Photo
Published on
Updated on

Group promoters, ASHA workers protest in front of Zilla Parishad

जालना, पुढारी वृत्तसेवा : गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांना निवेदन देण्यात आले.

Jalna News
Jalna News : सरन्यायाधीशांवरील हल्ला प्रकरणाचा निषेध

सिटू सलग्न गटप्रवर्तक आशा कर्मचारी फेडरेशनच्यावतीने जिल्हा परिषदे समोर गटप्रवर्तक व आशा यांच्या प्रलंबित मागण्यासाठी निदर्शन करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, गटप्रवर्तक व सत्तर हजारांपेक्षा अधिक आशा स्वंयसेविका कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागाचा कणा म्हणून त्यांना संबोधले जाते. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचा प्रपंच त्यांच्या मानधनावरच अवलंबून आहे. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ या ४ महिन्याचे मानधन अद्याप झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

काम करुनही मानधन चार-चार महिने प्रलंबित असल्यामुळे त्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. बहुतांश गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांवर संपूर्ण कुटूंबाची जिम्मेदारी आहे. गटप्रवर्तकांना दौरे करण्यासाठी हातात पैसे शिल्लक न राहिल्यामुळे कोणाकडून उसनवारी पैसे घेवून दौऱ्याचा खर्च भागवावा लागत आहे.

Jalna News
Jalna News : सरन्यायाधीशांवरील हल्ला प्रकरणाचा निषेध

यावेळी सिटुचे नेते अण्णा सावंत, जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे जिल्हासचिव सरिता शर्मा, जिल्हा सेक्रेटरी अॅड. अनिल मिसाळ, दीपा रगडे, कल्पना मिसाळ, कुशिव्रता डापके, बेबी शेख, सुजाता छडीदार, अनिता सोनवणे, आशा जगताप, ज्योती राठोड, रेखा गाडेकर, अश्विनी झोल, वनिता कपाळे, अनिता बनकर यांच्यासह गटप्रवर्तक व आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या आहेत मागण्या

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचे दरमहा ५ तारखेपर्यंत केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित व नियमित दरमहा मानधन देण्यात यावे, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना मातृ ऍप वर ऑनलाईन कामे करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्यात यावी, गटप्रवर्तकांना जिओ टॅगची सक्ती करण्यात येऊ नये, मानधनाचे पगार पत्र देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे किरकोळ रजा व सणाच्या सुट्ट्या दिल्या जाव्यात आदी मागण्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news