

Girl says she doesn't want a farmer husband
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफाबाद तालुक्यातील उपवर मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून वय होत असल्याने नवरदेवांना आता लग्नाची झाली घाई, नवरी म्हणते शेतकरी नवरा नको ग बाई! असेल शेती आणि नोकरी तरच मिळेल छोकरी, अशी मुलींची व आई वडिलांची विचार धारा निर्माण झाली.
जाफराबाद तालुक्यात गेल्या दहा वषात मुलींचा जन्म दर हा कमालीचा घटत चालला असल्याने ही परिस्थिती उद्धभवली आहे. जर हाच जन्म मृत्यूदर वेळीच शासनाने रोखला असता तर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. आज ग्रामीण भागात एका एका गावात जवळपास शंभर ते दीडशे बिगर लग्नाची मुले दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वीचा एक काळ असा होता की एकदा मुलगी लग्नाच्या वयाची झाली की वडिलांची वर शोधण्यासाठी दमछाक व्हायची. मागेल तो हुंडा देऊन सोयरीक जमविल्या जायची पुन्हा लग्न वर पिता म्हणेल तसे केले जात असे. त्यावेळेस मुलींची संख्या जास्त होती. हळूहळू मुलींचे प्रमाण कमी होत गेले तेव्हा वर मुलगा म्हणायचा...
हुंडा नको मामा फक्त मुलगी द्या मला.. असे म्हणायचे आता मात्र दोन तीन परिस्थिती आणखीन बिकट झाली नवरदेवासाठी मुलगी शोधण्यासाठी वर पित्याची दमछाक सुरू असून आता नवरदेव म्हणतो. हुंडा देतो मामा लग्न सुध्दा करून घेतो फक्त मुलगी द्या मला....तरी सुद्धा मामा होकार देत नसल्याने नवरी मुलगी चांगलीच भाव खात असल्याने वरपित्याला नवरी शोधा शोध करूनसुध्दा मिळत नसल्याने वरपित्याच्या नाकीनव येत असल्याने उपवर मुलांचे आई वडील चिंताग्रस्त झाले आहे. अशी परिस्थिती निर्माण का झाली वंशाचा दिवा पाहिजे या हवेसपोटी गर्भातच जन्माच्या अगोदरच मुलींची खुडली गेलेली कळी हेच पाप आता नव्या पिढीला भोगावे लागत आहे.
मागील पाच सहा वर्षांपासून शासन मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असले तरी आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हजार मुलांच्या मागे काही ठिकाणी आठशे ते नवशे असे प्रमाण आहेत. शासन स्तरावर अनेक जनजागृती केली जात असतानाही समाजामध्ये प्रबोधन का होत नाही हा एक चिंतनाचा विषय होऊन बसला आहे. यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. न अंधश्रध्दा, हुंड्याच्या पध्दतीमुळे मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटत होता. वंशाचा दिवा ही संकल्पना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. पित्याचं नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते ! अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.