समृद्धी अपघातातील मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हुंदके आणि आक्रोशाने परिसरही गहिवरला
jalna news
समृद्धी अपघातातील मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारfile photo
Published on
Updated on

Funeral held in a mournful atmosphere for those killed in the Samruddhi accident

बदनापुर, पुढारी वृत्तसेवा :

समृध्दी महामार्गावर मजुरीसाठी जाणाऱ्या आठ महिलांचा बुधवारी अपघाती मृत्यु झाला. या महिला तालुक्यातील केळीगव्हाण, खादगाव व निधोना या गावातील होत्या. गुरुवारी मयत महिलांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांच्या हुंदके व आक्रोशाने परिसरही गहिवरला.

jalna news
तोडणी सुरू होण्याआधीच उसाला आले तुरे

समृद्धी महामार्गावर बुधवारी छोटा हत्तीला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात तालुक्यातील केळी-गव्हा, निधोना व खादगाव येथील आठ महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या. गुरुवारी त्यांच्यावर मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केळी गव्हाण येथे लक्ष्मीबाई संतोष मदन (वय ३५), ताराबाई गहिनाजी चौधरी (वय ६०) आणि कडुबाई रामदास मदन (वय ५५) तीन महिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर खादगाव येथील मंगलबाई प्रकाश शिनगारे (वय ५५,) यांच्यावरही त्यांच्या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव यासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

jalna news
Samruddhi Expressway accident : समृद्धीवर भरधाव ट्रक आला यमदूत बनून

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुःखद आणि भावनिक वातावरणात या चारही मृत महिलांचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश, गावकऱ्यांचे अश्रू आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकजण हळ-हळला होता. कुटुंबाच्या आध-ारस्तंभ असलेल्या या महिलांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमग्न वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश

या वेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या हस्ते पीडित कुटुंबांना धनादेश देण्यात आले. "या दुःखातून सावरण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत," असा दिलासा त्यांनी यावेळी कुटुंबीयांना दिला. तालुक्यातील निधोना येथील आदमाने कुटुंबावरही अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात अलकाबाई दादाराव आदमाने (४५) आणि कांचनबाई प्रकाश आदमाने (५०) या सख्ख्या जावा व सुमनबाई कचरू आदमाने (७०) या त्यांच्या चुलत सासू मयत झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news