Jalna News : अवैध वृक्षतोडीला वन विभागाचा दणका !

२.२०८ घनमीटर लाकूड जप्त, गांधीनगर परिसरात कारवाई
Jalna News
Jalna News : अवैध वृक्षतोडीला वन विभागाचा दणका !file photo
Published on
Updated on

Forest Department cracks down on illegal tree felling!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना वन विभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात धडक कारवाई करत गांधीनगर परिसरातून विनापरवाना तोड करण्यात आलेले २.२०८ घनमीटर लाकूड जप्त केले. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Jalna News
Jalna News : अवैध सावकाराने हडपलेल्या ५७ हेक्टरपेक्षा अधिक मालमत्ता कर्जदारांना केल्या परत

वन विभागाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि. ५) गांधीनगर येथील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान जॉनसन यशवंत पाखरे यांच्या मालकीच्या जागेवर लिंब प्रजातीचे १२ नग गोल इमारती लाकूड विनापरवाना तोड करून साठवून ठेव लेले आढळून आले. या लाकडाचे एकूण घनफळ २.२०८ घनमीटर इतके असल्याचे वन विभागाने सांगितले.

वन विभागाच्या पथकाने तत्काळ संपूर्ण लाकूडसाठा जप्त करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ तसेच महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Jalna News
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

ही कारवाई उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक सुदाम मुंढे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. वनपरीक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्व - ाखाली वनपरिमंडळ अधिकारी अनिल जाधव, वनरक्षक वायाळ, सोडगीर, घुगे व इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड, लाकडाची बेकायदेशीर वाहतूक अथवा साठवणूक होत असल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. पर्यावरण संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे. हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाने 'झाडे वाचवा, पर्यावरण जपा' हा संदेश देत अवैध वृक्षतोडीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सुदाम मुंढे, सहायक वनसंरक्षक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाने 'झाडे वाचवा, पर्यावरण जपा' हा संदेश देत अवैध वृक्षतोडीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सुदाम मुंढे, सहायक वनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news