

Fine of Rs 80 lakhs collected from vehicle owners, action taken against triple seat vehicle owners
नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून चालू वर्षात आतापर्यंत शहर वाहतूक शाखेने सुमारे ८० लाख १८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंडात्मक कारवाई होऊनदेखील वाहनधारकांना शिस्त लागत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्या तब्बल ३६ हजार ६२७ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. गत सात महिन्यांत केलेल्या या कारवायांत संबंधितांना तीन कोटी ५८ लाख ३८ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय नव्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील दृश्यांनुसार स्पिकरवर सूचना देऊन वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सिग्नल सुरू असतानादेखील काही महाभाग सर्रासपणे सिग्नल तोडून मार्गक्रमण करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशांवर दंडात्मक कारवाई करुन देखील त्यांना शिस्त लागत नसल्याचे कारवाईतून दिसून येत आहे. आतापर्यंत ट्रीपल सीट वसून प्रवास करणाऱ्या सुमारे १०२२४ वाहनधारकांवर १ कोटी २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या ३६ हजार ६२७ वाहन चालकांवर चालू वर्षात कारवाई केली आहे. त्यांना तीन कोटी ५८ लाख ३८ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.