अरेरे...ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

पारध येथे चोरीच्या घटनांमध्ये वाढ, गावात दहशतीचे वातावरण
Farmer's pair of bullocks stolen in Paradh
ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी चोरीलाFile Photo
Published on
Updated on

जालना : पुढारी वृत्तसेवा

भोकरदन तालुक्यातील पारध येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे. एक दिवस अगोदर पारध येतील दोन शेतकऱ्यांच्या गाड्या रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्‍या होत्‍या. शेतकरी शंकर बालू लोखंडे यांची एचएफ डीलक्स MH20FF5819 तर दुसरी संजय तेलंग्रे यांची बजाज कंपनीची प्लॅटिना MH21AA3596 या दोन्ही गाड्या समोरासमोर गल्लीत उभ्या होत्या, रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही गाड्या चोरीला गेल्या.

दारात लावलेल्‍या दुचाकी चोरीला

या दोन्ही गाड्या सकाळी वालसांगवी रोड नाक्याजवळ आढळून आल्‍या होत्‍या. या दोन्ही गाड्या त्याच गाड्या होत्या ज्या चोरीला गेल्या होत्या. तर या ठिकाणची दोन घरं फोडण्यात चोरांना अपयश आले. त्यातील एक घर उत्तम लोखंडे यांचं घर फोडण्यात आलं होतं. रात्रीच्या सुमारास चोरांनी येऊन दरवाजाची कडी वाकवून घरात असलेले कपाट फोडले. त्‍यामधील लहान मुलीचे काही चांदीचे व सोन्याचे दागिने व काही कपडे साड्या चोरांनी लंपास केल्या.

शेतकऱ्याची बैल जोडी चोरीला

एक दिवस होत नाही, तोच लगेच दुसऱ्या दिवशी शेतकरी संजय देशमुख यांचे शेत पारध वालसांगवी रोडवर आहे. या रोड लगतच बैलांचा गोठा आहे. तिथून त्‍यांची बैल जोडी रात्रीच्या सुमारास चोरीला गेली. एन पेरणीच्या तोंडावर बैल जोडी गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पारध येथे चोरट्यांची दहशत पसरली आहे.

गावात दहशतीचे वातावरण

गावातील नागरिकांच्या गाड्या चोरीला जाणे, घरफोडीच्या घटना होणे. शेतकऱ्यांच्या बैल जोडीचीही चोरी होणे, या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्‍यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्‍त वाढवावी. चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी चोरांना लवकरात लवकर पकडून त्‍यांच्यावर जरब निर्माण करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज

पारध येथे सलग दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यामुळे गाव आणि परिसरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक हे दहशतीखाली वावरत आहेत. त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून लोकांना आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्याची सुद्धा गरज आहे.
अझहर पठाण (समाजसेवक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news