

अंबड : तालुक्यातील खडकेश्वर येथील ज्ञानेश्वर सूर्यभान उबाळे (वय 47 ) या शेतकऱ्याने मंगळवार (9) जून रोजी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
खडकेश्वर येथे संशयित आरोपी सोमनाथ रामनाथ उबाळे, राजू रामनाथ उबाळे व भीमराव अण्णा मुळे (रा. भालगाव ता. अंबड) भागवत आसाराम लहाने (रा. मंगू जळगाव ता. अंबड) या चौघांनी संगनमत करून मयत सूर्यभान उबाळे यास तुझा मुलगा अभिषेक हा आमच्या मुलीस विनाकारणच फोन करून त्रास देतो असे म्हणून शिवीगाळ केली.
यावेळी तुझ्या मुलीला पळून घेऊन जाऊ व अभिषेक याचा मर्डर करण्याची तसेच मारहाण करण्याची धमकी आरोपींनी दिली. आरोपितांच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर सूर्यभान उबाळे यांने खडकेश्वर शिवारातील शेत शेत गट नंबर 82 मध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन फाशी घेतल्याची घटना घडली.
रात्री उशिरा गुन्हा दाखल
ज्ञानेश्वर उबाळे यांच्या मृत्युस संशयित चार आरोपी कारणीभूत असल्याची तक्रार मयताचा भाऊ शहादेव सूर्यभान उबाळे यांनी अंबड पोलिसांत दिल्याने पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी मध्यरात्रीनंतर उशिराने गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ढाकणे हे करीत आहे.