Jalna Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने सालगड्याला मारहाण

जालना तालुका पोलिस ठाण्यात आरोपी रघुनाथ रानधोने, देवीदास रानधोने व शाईनाथ रानधोने यांच्याविरुद्ध बीएनएस अन्वये गुन्हा नोंद
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गावातीलच तिघांनी एका ३५ वर्षीय सालगड्याला अडवून शिवीगाळ करत दगड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील पोकळवडगाव येथे रविवार, दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

पीडित मजूर गौतम दादाराव आढाव (३५, मूळ रा. सावरगाव हडप, ह.मु. पोकळवडगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादीत गौतम आढाव हे पोकळवडगाव येथील शेतकरी सुभाष बापूराव काळे यांच्याकडे सालगडी (शेतमजूर) म्हणून काम करतात गौतम हे गावातील दुकानात 'गायछाप' तंबाखू आणण्यासाठी गावातील रघुनाथ रानधोने याच्या घरासमोरून जात असताना रघुनाथने त्यांना अडवले आणि " इकडे ये, मला दारू पिण्यासाठी पैसे दे" अशी मागणी केली. यावर गौतम यांनी "माझ्याजवळ पैसे नाहीत, मी सालावर काम करून माझे पोट भरतो" असे सांगून पैसे देण्यास असमर्थता दर्शवली.

Crime News
Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

याचाच राग मनात धरून रघुनाथने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शाईनाथ रानधोने याने हातात लाकडी काठी घेऊन गौतम यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर आणि मांडीवर मारून मुक्का मार दिला. या मारहाणीनंतर "तू पुन्हा आमच्या घरासमोर उभा राहिला किंवा इकडे फटकला, तर तुला जिवेच मारून टाकू" अशी धमकी दिली.

या प्रकरणी गौतम आढाव यांच्या जबाबावरून जालना तालुका पोलिस ठाण्यात आरोपी रघुनाथ रानधोने, देवीदास रानधोने व शाईनाथ रानधोने यांच्याविरुद्ध बीएनएस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार किशोर जाधव करत आहेत.

Crime News
Dombivli Crime | १२ वर्षांपूर्वीच्या अपहृत तरूणाच्या खूनाचा लागला छडा! कथित रीलस्टार सुरेंद्र पाटीलचा भयानक कारनामा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news