बडी सडकला 'अतिक्रमण'चा विळखा; लग्नसराईत शेकडो वाहनांची गर्दी

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच बडी सडक मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
jalna news
बडी सडकला 'अतिक्रमण'चा विळखा; लग्नसराईत शेकडो वाहनांची गर्दीfile photo
Published on
Updated on

'Encroachments' Tighten Their Grip on Badi Sadak; Hundreds of Vehicles Crowd the Street During the Wedding Season

जालना, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच बडी सडक मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. शनी मंदिर परिसरातील या कापड दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असून, रस्ताच अक्षरशः अडवला जात आहे. परिणामी या मार्गावर सतत ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे.

jalna news
Nanded news | हदगाव शहरासह ग्रामीण भागात अवैध मटका-जुगाराचा सुळसुळाट...

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने बस्ता खरेदीसाठी येथे येत आहेत. दुकानासमोर शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने अनियमितपणे उभी राहत असल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या संदर्भात काही नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, दुकानमालक व कर्मचाऱ्यांचे वर्तन उद्धट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "रस्ताच आमच्या मालकीचा आहे' अशा भाषेत नागरिकांना उत्तर दिले जात असल्याचा गंभीर आर- ोपही समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

jalna news
Vasmat encroachment drive : तालुक्यातील शेत रस्त्यांवरील अतिक्रमणांवर होणार कारवाई

अनधिकृत पार्किंगवर कारवाईची मागणी

बडी सडकवरील अतिक्रमण वाढले असून, ते तात्काळ हटवावे. शहरातील विविध दुकाने, आस्थापना आदींसह इतर ठिकाणी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी. वाहतूक शाखेने यावर कडक निर्बंध लावावे. संबंधित दुकानमालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news