जालना पोलिस दलातील ८ अंमलदारांना पदोन्नती

पोलिस अधीक्षक बन्सल : सहायक फौजदारपदी वर्णी, दोन महिला अंमलदारांचाही समावेश
Eight officers in the Jalna police force have been promoted
जालना पोलिस दलातील ८ अंमलदारांना पदोन्नतीPudhari
Published on
Updated on

Eight officers in the Jalna police force have been promoted

जालना, पुढारी वृत्तसेवा :

जालना पोलीस दलातील ८ पोलीस हवालदारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले असून, या ८ अंमलदारांना आता सहायक फौजदार म्हणून बढती मिळाली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Eight officers in the Jalna police force have been promoted
Subsidy Scam : जालन्यातील २४ कोटींच्या अनुदान घोटाळ्याचा मास्टरमाइंड जेरबंद

महाराष्ट्र पोलीस पदोन्नती मिळालेल्यांमध्ये पोलीस मुख्यालय, परिवहन विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात दोन महिला अंमलदारांचाही समावेश असून, त्यांनाही सहायक फौजदार म्हणून कामाची संधी मिळाली आहे.

Eight officers in the Jalna police force have been promoted
मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

पदोन्नती मिळालेले अंमलदार व त्यांचे सध्याचे नेमणूक ठिकाण

अशोक खरात (पोहेकाँ, परिवहन विभाग)

संजय कुलकर्णी (पोहेकाँ, परिवहन विभाग)

श्रीमंत शिंदे (पोहेकाँ, पोलीस मुख्यालय)

रामा वंजारे (पोहेकाँ, परिवहन विभाग)

पुष्पा सूर्यवंशी (मपोहेकाँ, पोलीस ठाणे बदनापूर)

विजयकुमार बिहऱ्हाडे (पोहेकाँ, पोलीस मुख्यालय)

आनंदराव कनाके (पोहेकाँ, पोलीस मुख्यालय)

पुष्पा खरटमल (मपोहेकाँ, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news