

जालना, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ पेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई- केवायसी करण्याची अट घातली आहे.. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध 'ई- केवायसी'तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून 'ई-केवायसी' न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना 'ई-केवायसी'चे बंधन भालण्यात आले आहे. अत्र आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांली 'ई-केवायसी' ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी, 'ई-केवायसी' करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिकादेखील रद्द केल्या जाणार आहेत.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीन आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांनादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातीलं स्वस्त धान्य- दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई- केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानात ही प्रक्रिया सुरू आहे. काही दुकानदार प्रत्येक व्यक्ती पन्नास रुपये घेत असल्याचे लाभार्थी यांनी सांगितले.
रेशनकार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत. दुसरीकडे बनावट रेशनकार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सर्वाना 'ई-केवायसी' करावीच लागणार आहे. त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात, पण, रेशनकार्डवरील जो कोणी सदस्य मुदतीत 'ई-केवायसी' करणार नाही त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल,
शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ई केवायसी प्रक्रिया निःशुल्क आहे. स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते. ई-केवायसी करण्यास रेशन दुकानदाराने पैसे मागितल्यास तक्रार करण्याच्या सूचना केल्या आहे.