E-bus : ई-बस असून अडचण, साध्या बसच्या फेऱ्या सुरू करा

ई-बसमधे विद्यार्थी, नोकरदार आणि मासिक पासधारकांना सवलत नसल्याने त्यांणना या बसमधे प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ST bus MSRTC
ST bus MSRTC ST bus MSRTC
Published on
Updated on

E-buses are causing problems; start regular bus services

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद आगाराची ई-बस टेंभुर्णी-जालना मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळेत सुरू करण्यात आली आहे. या ई-बसमधे विद्यार्थी, नोकरदार आणि मासिक पासधारकांना सवलत नसल्याने त्यांणना या बसमधे प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी साडेपाच ते ९ वाजेच्या दरम्यान साध्या एसटी बसच्या फेऱ्या बंद झाल्याने पासधारकांना ईबसमधे अतिरिक्त भाडे भरून प्रवास करावा लागत आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत ई-बस सोडण्याचा निर्णय जाफराबाद आगाराने तातडीने मागे घेऊन या मार्गावर ई-बस ऐवजी सकाळी गर्दीच्या वेळेस साध्या बसेस सोडाव्यात अशी मागणी होत आहे.

ST bus MSRTC
City Bus : प्रवासी संख्येनुसार ठरणार शहर बसच्या फेऱ्यांचे नियोजन

पूर्वी जाफराबाद आगाराची सकाळी साडेपाच, साडेसहा, सात, साडेसात व आठ वाजता टेंभुर्णीहून जालनाकडे एसटीच्या साध्या बसेस नियमित फेऱ्या करीत होत्या. या बसमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच मासिक पासधारकांना सवलतीचा लाभ मिळत होता. मात्र, इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर सकाळच्या सर्व प्रमुख फेऱ्या इलेक्ट्रिक बसच्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या वेळेत केवळ सव्वा सात वाजता एक साधी बस उपलब्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या आरोपानुसार, इलेक्ट्रिक बसमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा मासिक पास स्वीकारले जात नसल्याने पास असूनही रोख रक्कम देऊन तिकीट काढावे लागत आहे.. यामुळे दररोज जालना येथे शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. टेंभुर्णी ते जालना या मार्गावरील लाल बसचे तिकीट सुमारे ५० रुपये असताना इलेक्ट्रिक बसचे भाडे ८० रुपये आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महिन्याला यामुळे मोठा अतिरिक्त खर्च सहन कराव लागत असल्याचा दावा करण्यात आल आहे.

ST bus MSRTC
Jafrabad electric bus : जाफराबादच्या प्रवाशांना इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा

एका पालकाने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन मुलांचे विद्यार्थी पास असूनह सकाळच्या वेळेत एसटीची साधी बर उपलब्ध नसल्यामुळे रोज अतिरिक खर्च करावा लागत आहे. तर, जालन्या नोकरी करणाऱ्या एका प्रवाशान मासिक पास असूनही त्याचा उपयो-होत नसल्याने ही प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

...तर आंदोलन

जाफराबाद आगारप्रमुखांनी सकाळच्या वेळेत पुन्हा पूर्वीप्रमाणे एसटीच्या साध्या बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात नसता इलेक्ट्रिक बसमध्ये पासधारकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news