Water Tanker : लालफितीत अडकलेले दुनगावचे टँकर अखेर सुरू

अंबड तालुक्यातील दुनगाव येथील पाणीपुरवठ्याचे टँकर तब्बल पंधरा दिवस लालफितीत अडकून बंद होते.
Water Tanker
Water Tanker : लालफितीत अडकलेले दुनगावचे टँकर अखेर सुरूfile photo
Published on: 
Updated on: 

Dungaon village Ambad taluka water supply tankers stalled fifteen days

अंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील दुनगाव येथील पाणीपुरवठ्याचे टँकर तब्बल पंधरा दिवस लालफितीत अडकून बंद होते. विशेष म्हणजे, २ नोव्हेंबर रोजी अंबड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ यांना टँकरच्या बिलावरून मारहाण झाल्याची घटना घडली.

Water Tanker
Marigolds : शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली झेंडूची शेती

त्याच दिवशी दुनगावच्या टँकरच्या मुदतवाढीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानंतरच प्रशासकीय यंत्रणेची चक्रे फिरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग, तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय या तीनही कार्यालयांतील दिरंगाई, अनागोंदी आणि लालफितीच्या कारभाराचा फटका दुनगावच्या ग्रामस्थांना बसला. टँकरला दिलेली पूर्वीची मान्यता पुन्हा नव्याने घेण्याच्या किरकोळ प्रशासकीय प्रक्रियेमुळे जून महिन्यापासून सुरू असलेला पाणीपुरवठा ऑक्टोबरच्या मध्यावर बंद पडला.

Water Tanker
Jalna News : जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

दप्तर दिरंगाईचा अनुभव

पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्येकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष गेले नाही; मात्र कर्मचाऱ्याला मारहाणीची घटना घडल्याच्या दिवशीच टँकरच्या मुदतवाढीचा आदेश निघाल्याने शासकीय कार्यालयांतील लालफितीचा कारभार आणि निर्णय प्रक्रियेतील दिरंगाई पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.