डोलखेडा येथील मारहाणप्रकरणी दोषीला २ महिन्यांची शिक्षा, ६ हजारांचा दंड

Jalna News | जुन्या वादातून शिवहारी डोईफोडे यांना मारहाण
Jalna, Dolakheda  Assault Case
शिवहारी डोईफोडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी दोषीला दोन महिन्यांची शिक्षा आणि सहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.File Photo
Published on
Updated on

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः डोलखेडा (ता. जाफ्राबाद) येथील शिवहारी डोईफोडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषीला दोन महिन्यांची शिक्षा आणि सहा हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने आज (दि. ४) सुनावली. या प्रकरणी शिवहारी नारायण डोईफोडे यांनी फिर्याद दिली होती.

जाफ्राबाद तालुक्यातील डोलखेडा येथील जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत फिर्यादी शिवहारी नारायण डोईफोडे यांना गावातीलच आरोपीने हातपाय बांधून जबर मारहाण केली होती. त्यानंतर जाळीत फेकून दिले होते. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक लामा, अतिष तिडके, ठाकूर यांनी केला. सरकारी अभियोक्ता श्रीमती जाधव यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

Jalna, Dolakheda  Assault Case
जालना : गोसावी पांगरी येथील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news