

जालना : धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजा-वणीच्या मागणीसाठी जालना येथे उपो-षणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी (दि.30 सप्टेंबर) दुपारी महाधिवक्ता यांच्यासोबतही शिष्टमंडळाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे आमरण उपोषण करीत आहेत. मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवावे, असे त्यांना कळवले होते. सोमवार (२९) रोजी दीपक बोहाडे यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झालेल्या बैठकीत धनगर अनुसूचित जमाती आर-क्षणच्या अंमलबजावणी एवढीच मागणी लावून धरली. बैठकीला मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री पंकजाताई मुंडेंसह आमदार नारायण कुचे व आ. अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या इतिहासात धनगर आरक्षण या विषयावर जमातीच्या अभ्यासकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अत्यंत प्रामाणिकपणे मांडणी केली.
धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी
बैठकीत केवळ भारतीय संविधानातील कलम ३४२ (१) नुसार धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांचा कायदेशीर सल्ला लगेच घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्यांपैकी कोणीही माध्यम प्रतिनिधी तसेच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिलेली नाही.