Jalna News : आठवडे बाजारात माठांची मागणी वाढली

घनसावंगी तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला, अंगाची लाहीलाही
Jalna News
Jalna News : आठवडे बाजारात माठांची मागणी वाढलीfile photo
Published on
Updated on

Demand for earthen pots has increased in the weekly markets

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची चाहूल लागताच आठवडे बाजारासह स्थानिक बाजारात माठांची मागणी वाढली आहे. माठाला गरिबाचे फ्रीज म्हणून ओळखले जाते.

Jalna News
Lemon prices rise : तापमानात वाढ, लिंबाचे भाव कडाडले; उन्हाचा पारा चढल्याने मागणीत झाली वाढ

उन्हाळा सुरू होताच तापमानात वाढ होत असून, उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे थंड पाण्याची गरज वाढली आहे. पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते तसेच त्याला गोडसर चव येते, त्यामुळे ते लाभदायक मानले जाते.

याच कारणामुळे आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात वापर केला. यंदाही हॉटेल तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला उन्हाचा तडाखा कमी असला तरी आता तापमानात झपाट्याने वाढ होत असून, यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता नागरिकांकडून केली जात आहे. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेकजण थंड पेयांकडे मात्र पाणी काहींना त्रासदायक नैसर्गिक थंडावा देणाऱ्या अधिक पसंती दिली जाते.

Jalna News
यंदा चिकू भरघोस; दरामुळे शेतकरी चिंतेत

घनसावंगीच्या आठवडी बाजारात माठांची किंमत साधारणपणे २०० ते ५०० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. वाढत्या मागणीमुळे कुंभार समाजालाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असून, त्यांच्यासाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच थंडगार पाणी आवडत असल्याने आजही हा ग्रामीण व शहरी भागातील माठ अविभाज्य घटक ठरत आहे. येथील आठवडे बाजारात ग्राहकांनकडून मोठी मागणी होत असल्याचे दिसत आहे.

फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी थंड आणि चवीला गोड लागते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही माठ खरेदी करतो. आरोग्यासाठी ते फायदेशीर वाटते. नैसर्गिक उपाय असल्यामुळे आजही त्याला आमची मोठी पसंती आहे.
शरद आधुडे, ग्राहक
उन्हाळ्याची सुरुवात होताच माठांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दररोज बाज-ारात ग्राहकांची संख्या वाढताना दिसत आहे. सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी होत आहे. नैसर्गिकरीत्या थंड आणि गोडसर पाणी मिळत असल्यामुळे लोक आजही माठला प्राधान्य देतात.
- कारभारी आहेरकर, विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news