आन्वा भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे दुरवस्था झाली आहे. शाळा इमारतीच्या पाच खोल्या पावसाल्यात गळत असून मोडकळीस आले आहेत. या गळक्या खोल्यांमुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या इमारतीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
दानापूर येथे पहिली ते सातवीपर्यंत मराठी व पहिली ते आठवीपर्यंत उर्दू माध्यमाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत मराठी माध्यमाचे १०० विद्यार्थी तर उर्दू माध्यमाचे १९० विद्यार्थी शिक्षण घेतात मराठी माध्यमाच्या पाच खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ६० वर्षांपूर्वी बनवलेल्या या खोल्या छताला गळती लागली आहे. तसेच वर्गामध्ये घुशीचे साम्राज्य असल्याने गड्ढे करून माती फरशीच्या वर येत आहे.
पावसाळ्यात पावसाचे पाणी वर्गात विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून वर्गात साचत असते जागोजागी छतातून टपकणारे पाणी खाली भांडे ठेवून पावसापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी वर्ग खोल्यात कोपऱ्यात बसत असतात, तसेच वर्ग खोल्यांच्या भिंती देखील जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात कधीही भिंत कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शाळेचे दरवाजे व खिडक्या देखील खिळेखिळे झाले आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या संदर्भात शिक्षण विभागाला अनेक वेळा लेखी स्वरूपात माहिती दिलेली आहे. खोल्यांची दुरुस्ती तत्काळ करा नवीन खोल्या ह्या, परंतु शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप शालेय समितीच्या वतीने केले जात आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी पांचाल यांनी ही येथे लोकसभा निवडणुकीच्या काळात बूथ पाहणी करताना या खोल्यांची पाहणी करून तत्काळ अहवाल दाखल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिले होते, तरीही मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त केले जात आहे. खोल्या पाहून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याचे दिसून येत आहे.
66 शाळेच्या दुरुस्तीसंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी लेखी स्वरुपात कळविलेले आहे तरी शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नाही वर्गखोल्यावरील पूर्ण पत्रे गळत असून भिंतीला भेगा पडल्या आहेत. पावसाचे पाणी या भेगातून शिरून भिंत कोसळू शकते त्यामुळे शिक्षण विभागांचे याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
शेख जफर, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती
नवीन खोल्यांसंदर्भात वरिष्ठांना अहवाहल सादर केला असून मिळाल्यानंतर दानापूर शाळेच्या वर्गखोल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
जी.बी. सोळुंके, केंद्रप्रमुख दानापूर