Lok sabha Election 2024 Results : काँग्रेसच्या कल्याण काळेंनी ५ वेळचे खासदार, दानवेंचे ‘ऑपरेशन’ कसे केले?

Lok sabha Election 2024 Results : काँग्रेसच्या कल्याण काळेंनी ५ वेळचे खासदार, दानवेंचे ‘ऑपरेशन’ कसे केले?

[author title="विजय सोनवणे" image="http://"][/author]

भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : जालना लोकसभा मतदार संघामध्ये अखेर 28 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडीत काढत रावसाहेब दानवेंचा गड काबीज करण्यात काँग्रेसच्या डॉ.कल्याण काळे यांना मोठे यश मिळाल्याने जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारल्याचे दिसत आहे. डॉ.काळे यांच्या विजयाचे भोकरदन विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. डॉ.कल्याण काळेंसारखा विरोधक, मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा, वंचितची भूमिका व दानवेंच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बनसी त्याचा फायदा उचलत काँग्रेसचे काळे यांनी 2009 मध्ये हुकलेला विजय 2024 मध्ये साकारल्याचे बोलल्या जात आहे.

रावसाहेब दानवे यांनी 1999 पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला होता. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते. त्यानंतर उत्तमसिंग पवार, कल्याण काळे, विलास औताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले. जालना जिल्ह्यात 1999 मध्ये सर्वाधिक 72.48 टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये रावसाहेब दानवे 57.73 टक्के मतदान घेऊन निवडून आले होते. जालना लोकसभेत 1991 ची निवडणूक वगळता आठ वेळा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. 1989 मध्ये पुंडलिक हरि दानवे, 1996 व 1998 च्या निवडणुकीमध्ये उत्तमसिंग पवार, यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांनी आपल्याकडे खेचून आणला होता. आणि तो 2024 पर्यंतच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडेच होता. 1999 पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. 2009 चा अपवाद वगळता दानवेंचं मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपच्या अनुभवी आणि 35 वर्ष राजकरणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडात जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री ,पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. आणि काही भाग वगळता या सगळ्या ठिकाणाहुन त्यांना नाकारण्यात आल्याचे दिसत आहे.

एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार, अंकुशराव टोपे यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या वतीने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1991 साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता, हा काँग्रेसचा भाजप उमेदवार रावसाहेब दानवे पराभुत होई पर्यंत शेवटचा विजय होता. आता डॉ.काळे यांनी ही परंपरा मोडीत काढली असुन त्यांनी 1996 पासून भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिलेल्या आणि गेली 7 टर्म या मतदारसंघावरत विजय मिळवलेल्या भाजपच्याच वर्चस्वाला सुरंग लावला आहे. महत्वाचे म्हणजे यातील 5 टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचाच विजय झाला होता आणि ते या वेळी विजयाचा षटकार मारतील असा अंदाज भाजपाचा होता. तो डॉ.काळे यांनी फेल ठरवीला आहे.

1996 आणि 1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फे निवडून आले होते. 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1999मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी श्री दानवे दोन वेळेस भोकरदन – जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2009 मध्ये काँग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती या लढतीत डॉ. कल्याण काळे यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 2014 साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा 2 लाख 6 हजार 798 मतांनी पराभव केला होता. 2019 निवडणुकीचा निकाल मागील निवडणुकी पेक्षाही रावसाहेब दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजयी झाले होते. आता त्याच दानवेंचा डॉ.काळे यांनी पराभव केला आहे. सातवेळा पराभव झाल्याने काँग्रेस जालना लोकसभेवरचा दावा सोडणार होती अशाही चर्चा होत्या हे विशेष.

 तब्बल 28 वर्षानंतर रावसाहेब दानवेंना धक्का

2003 नंतर भोकरदन विधासभा मतदार संघात 2003 साली रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाला पहिला धक्का बसला. 2003 साली त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर पोटनुवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि निवडून आले. खरंतर ही लढत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दानवे यांचे वडील माजी खासदार पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेंव्हापासूनच दोन्ही दानवे राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. पुढे 1985 साली पहिल्यांदा भोकरदन विधानसभेची रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली. यात काँग्रेसचे संतोष दसपुते यांच्याकडून त्यांचा 1 हजार 568 मतांनी पराभव झाला. मात्र अत्यल्प मतांनी झालेल्या पराभवाने ते मतदारसंघात चर्चेत आले. पुढे 1990 मध्ये काँग्रेसचे त्यावेळचे प्रमुख नेते रंगनाथ पाटील यांचा त्यांनी 25 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आणि तेव्हापासून दानवे यांच्या याच विजयाचा अश्वमेघ अद्यापपर्यंत कोणाला रोखता येत नव्हता.

तो 2003 ला चंद्रकांत दानवे यांनी रोखला होता, चंद्रकांत दानवे यांनी पुढे 12 वर्ष भोकरदन मतदारसंघात आपले वर्चस्व गाजवले. मधल्या काळात म्हणजेच 2009 साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधासभेच्या रिंगणात उतरवले यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला. यात निर्मला दानवे यांचा 1 हजार 639 मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला होता.

2014 मध्ये मात्र भोकरदन विधासभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधासभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6 हजार 750 मतांनी विजय झाला. यावेळी विधानसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्राला यश आले होते. त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे 2014 पासून भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आता मात्र लोकसभेचा गड रावसाहेब दानवेंच्या हातुन निसटला आहे. त्यामुळे संतोष दानवे भोकरदन विधानसभेचा गड साबुत ठेवतात हे पाहणे पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news