Manoj Jarange : नार्को टेस्ट करा अन् सत्य बाहेर येऊ द्या

माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी माझी, धनंजय मुंडे, अमोल खुणे आणि इतर संशयितांची मिळून पाच जणांची नार्को टेस्ट करा. यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, अशी आक्रमक मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
Marathwada Kunbi certificate
मनोज जरांगे- पाटील(Pudhari Photo)
Published on
Updated on

Conduct a narco test and let the truth come out: Manoj Jarange

जालना, पुढारी वृत्तसेवा : माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी माझी, धनंजय मुंडे, अमोल खुणे आणि इतर संशयितांची मिळून पाच जणांची नार्को टेस्ट करा. यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, अशी आक्रमक मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. गुरुवारी जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणातील संशयित अमोल खुणे याने दिलेला नार्को टेस्टचा अर्ज तत्काळ न्यायालयात सादर करण्याची मागणी केली.

Marathwada Kunbi certificate
Atal Bhujal Yojana : अटल भूजल योजनेतून जालन्यात १७ कोटींचा खर्च

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अमोल खुणे हा काही धुतल्या तांदळाचा नाही. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या घातपाताचा कट रचला गेला आहे. या कटामागे कोण आहेत, हे नार्को टेस्टमुळे समोर येईल. खुणे याने स्वतःहून नार्को टेस्टची मागणी केली आहे, तर मग पोलिस प्रशासन त्याचा अर्ज न्यायालयासमोर सादर करायला उशीर का करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आपल्या जीवाला धोका असल्याचे मान्य करतानाच जरांगे यांनी एक धक्कादायक मागणी केली. माझी सध्याची सुरक्षा व्यवस्था काढून घ्या, असे मी पोलिस अधीक्षकांना सांगितले आहे. माझा घातपात करण्यासाठी परळीच्या मत्यालाफ मोकळं मैदान पाहिजे, म्हणूनच मी ही मागणी केली आहे. मी कशालाही डगमगत नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Marathwada Kunbi certificate
मराठवाड्यातील रेल्वेमार्गासाठी १४ हजार कोटींची तरतूद

... तर समोर ये

व्हायरल कॉल रेकॉर्डिंगवर तीव्र प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील अधिकच आक्रमक झाले. त्यांनी थेट आव्हान दिले की, तू एका बापाचा असशील तर मला मारायला ये, तुझे बोटही परत जाऊ देणार नाही. तसेच, या प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news