उघड्यावर मांसविक्रीमुळे मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; नागरिकांत भीती !

Jalna news | १८ विक्रेत्यांना नोटीस, गुन्हे दाखल करण्याचा इशारा
उघड्यावर मांसविक्रीमुळे मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; नागरिकांत भीती !
Published on
Updated on

जालना : शहरातील नूतन वसाहत व घाटी रोड परिसरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या मांसाच्या तुकड्यांमुळे भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात या भागात जमा होत असून, त्यांनी लहान मुलांवर व पादचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिकेने स्वच्छता व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे धडक कारवाई करत १८ मांस विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. नूतन वसाहत उड्डाणपूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि घाटी रोड भागातील अतिक्रमणे हटवण्यात आली.

मांस विक्री करताना काचेचे कपाट, पडदा किंवा हिरवी जाळी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news