

अकबर शेख
शहागड प्रतिनिधी : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्यावर नवीन नवरीचा मृत्यू झाल्याची घटना पंचाळेश्वर (ता.गेवराई) येथे घडली.
दिपाली प्रल्हाद हुलमूक (वय.१८ वर्षे) राहणार गंगा चिंचोली (अंबड) हिचा अरविंद शेळके (रा.पंचाळेश्वर, ता. गेवराई) याच्या सोबत या तरुणीचा दि.२९ जून रविवारी सायंकाळी लग्न सोहळा संपन्न झाला. सोमवारी सकाळी पंचाळेश्वर (ता.गेवराई) येथे हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना नवीन नवरी दिपाली शेळकेच्या पोटात दुखत असल्याने चक्कर येऊन पडली. दरम्यान उपचारासाठी रुग्णालयात नेतांना सावळेश्वर या गावाजवळ तीने प्राण सोडला.
अधिकच्या महितीनुसार शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन चा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील. ही घटना गेवराई तालुक्यातील असल्याने चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात येईल असे, जमादार फुलचंद हजारे यांनी सांगितले.