illegal timber seizure : भोकरदनमध्ये वन विभागाचा सर्जिकल स्ट्राईक; लाकूड जप्त

लाकूड माफियांमध्ये खळबळ! ; 8 टन अवैध लाकूड हस्तगत
illegal timber seizure
जालना ः वन विभागाच्या वतीने 8 टन अवैध लाकूड जप्त केले आहे. या प्रसंगी उपस्थित वन अधिकारी, कर्मचारी. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः भोकरदन शहरातील संतोषी माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात वन विभागाने 1 मे रोजी मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे टाकण्यात आलेल्या या छाप्यात सुमारे 8 टन बेकायदेशीर लाकूड जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून खळबळ उडाली आहे.

झाडांची कत्तल आणि साठवणूक उघडगेल्या काही दिवसांपासून परिसरात झाडांची विनापरवाना बेसुमार कत्तल सुरू होती. याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने संतोषी माता मंदिर परिसरात छापा टाकला. या कारवाईत आंबा, निम (कडू लिंब) आणि भोकर या प्रजातींच्या झाडांची विनापरवाना तोड करून त्याची अवैध साठवणूक आणि वाहतूक केल्याचे उघड झाले.

illegal timber seizure
लाकूड माफियांकडून डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल

पथकाने घटनास्थळावरून अंदाजे 3 टन गोल इमारती लाकूड आणि 5 टन जळाऊ लाकूड असा एकूण 8 टन मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र वृक्ष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखलया प्रकरणी महाराष्ट्र वृक्ष अधिनियम 1964 अंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या लाकडाचा रीतसर पंचनामा केला. यात सामील असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

illegal timber seizure
Satara News: सह्याद्रिच्या कुशीत वनव्यांची मालिका

बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची खैर नाही! - परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वनसंपत्तीचे नुकसान होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील आणि पर्यावरण हानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.‌‘

नीता फुले, वनपरीक्षेत्र अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news