Jalna News : सीसीटीव्हीसह स्वच्छतागृहांची उभारणी करा

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिता जाधव यांची मागणी, पालिकेला निवेदन सादर
women safety demand CCTV
भोकरदन ः मुख्याधिकारी यांना निवेदन देताना पदाधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन ः भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर महिला, मुलींसाठी शौचालयासह सुरक्षिततेदृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या अनिता जाधव यांनी केली. त्यांच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा समरीन नाज मिर्झा यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले, की भोकरदन शहरात पोलीस स्टेशन पासून तर जालना रोड, नवीन भोकरदन पर्यंत तसेच महात्मा फुले चौकापासून (सिल्लोड रोड) तर जाफराबाद रोड भोकरदन शहरहद्दी पर्यंत तसेच बाजारपट्टी भागातील भाजीपाला विक्रेत्या महिलांसाठी कुठेही शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे महिला व मुलींची कुचंबना होते.

women safety demand CCTV
Jalna News | स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान व्हावा : डागोर

ग्रामीण भागातील महिलांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उध्दभू शकतो. त्यामुळे भोकरदन शहरात मुख्य रस्त्याच्या कडेला शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणेकरून महिला व मुलींच्या सुरक्षेस मदत होईल अशी देखील मागणी केली.

women safety demand CCTV
RPF rescue operation : चोरी, दरोड्याचा कट उधळला

यावेळी नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा, उपनगराध्यक्षा सुरेखा बालूअण्णा जाधव, नगसेवक भूषण शर्मा, नगरसेविका शिला भारती यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news