

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील वालसावंगी पिंपळगाव रेणुकाई, पारध व परिसरात खरीप हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या मिरची लागवडीला आतापासूनच प्रारंभ झाला असून आठवड्याभरापासून हजारो हेक्टरवर ठिबक सिंचनावर मल्चिंग कापडाच्या सहाय्याने मिरची लागवड झाल्याचा अंदाज भोकरदन तालुक्यातील दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी हे गाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात 50 ते 60 हजार हेक्टरवर मिरची लागवड केली जाते व परिसरात सर्वात मिरची लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात हजारो हेक्टरवर मिरची लागवड होते परंतु गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच मिरचीला चांगला भाव मिळाल्याने व शेवटपर्यंत मिरचीचे भाव महाराष्ट्र आंध्रप्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यात टिकून राहिले.
त्यामुळे शेतकरी मिरचीचा चांगला भाव घेऊन मलामाल झाले आहे असे चित्र गेल्यावर्षी दिसून आल्याने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना हिरवी मिरची मालामाल करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी अगोदरच दुप्पट मिरची लागवड वाढवली असून आतापासूनच शेतकऱ्यांनी मिरची लागवडीसाठी मोठी कंबर कसली असून परिसरातील वालसावंगी, धावडा, पारध ,पिंपळगाव रेणुकाई, अन्वा, जळगाव सपकाळ. लेहा, वडोद तांगडा आदी परिसरात मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच मिरचीला मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची लागवड केली तसेच शेतकरी एप्रिल पासूनच लागवड करीत आहे त्यामुळे यावर्षी मात्र शेतकऱ्यांना हिरवी मिरची मालामाल करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या वर्षी सुरुवातीला मिरचीला 40 ते 50 रुपये किलोचा हमीभाव शिल्लक चा टिकून राहिल्याने मिरचीचे भाव तेजीत राहिले त्यामुळे यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढविले आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने मिरची पिकांची महागडी औषधी फवारणी करण्यात येत आहे.
प्रल्हाद तांगडे, मिरची उत्पादक, शेतकरी