Jalna News : अंबड शहरातील पुरातन जलस्रोतांची दुरवस्था

स्वच्छता आरोग्य सभापतींची जलस्रोत संवर्धनाची मागणी, मुख्याधिकारी यांना निवेदन
Ambad Water Conservation
अंबड : शहरातील पुरातन जलस्रोताची अशी दुरवस्था झाली आहे. pudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये आधार ठरू शकणाऱ्या अंबड शहरातील जलस्रोतांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. जलस्रोतांचे संवर्धन करून पाणीपुरवठासाठी उपयोग करावा व नेहमीसाठी या जलस्रोतांचे संवर्धन करून पुरातन वारसा जोपासण्यात यावा अशी मागणी नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती सचिन खरात यांनीच मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अशा असलेले पुरातन जलस्रोत आधार ठरू शकतात. दुष्काळाची तीव्रता दर्शन दिवस वाढत असून येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील अनेक पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे.

Ambad Water Conservation
Jalna Short Circuit Farm Fire : शॉर्टसर्किटमुळे अडीच एकर ऊस जळून खाक

अशा ऐतिहासिक बारव, विहिरी आणि तलावांचे संवर्धन करून जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. ऐतिहासिक बारव, विहिरी आणि तलावांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे.

तसेच या जलस्रोतांमधील पाण्याचा अनिर्बंध उपसा तात्काळ थांबविण्यात यावा. शहरातील महाद्वारी, नागोबा बारव, पाच पिंपळ, शक्कर बावडी, मोतीबाग बारव, चिंचबारव आणि बिसत्याचा आड या महत्त्वाच्या जलस्रोतांमधील गाळ काढून त्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जलसंकट टाळण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे.

Ambad Water Conservation
Namaqua Dove: उरणच्या सिमेंटच्या जंगलात दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

शहरातील बारवांच्‍या दुरुस्तीची गरज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळामध्ये अंबड शहरात विविध मंदिरे आणि जलस्रोतांचे उभारणी झालेली आहे. याबरोबर अन्य जलस्रोतसुद्धा शहरात उपलब्ध आहे. तो दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या सर्व बारवा, महाद्वारी यांची दुरुस्ती करून पाणी पुरवठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे सचिन खरात यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news