

Agricultural Dealers Face Difficulties Due to Linking with Fertilizers
मंठा, पुढारी वृत्तसेवा : उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने रासायनिक खताचा वापर केला जातो. यासाठी युरिया, डीएपी तसेच विविध कॉम्प्लेक्स खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, मागील काही वर्षांपासून खत उत्पादक कंपन्यांकडून खत विक्रेत्यांवर अन्य उत्पादने जबरदस्तीने घेण्याचा दबाव टाकला जात आहे. या सक्तीच्या विक्रीमुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर आर्थिक ताण वाढत असून, नको असलेली उत्पादने शेतकऱ्यांना देणे भाग पडत आहे.
परिणामी विक्रेते शेतकरी वर्गामध्ये बदनाम होत असल्याची खंत त्यांनी विक्रेत्यांनी केली आहे. तर नको असलेली खत उत्पादने घेऊन शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडत आहे. बळजबरीने लिंकिंग खते घ्यावी लागत असल्याने बळीराजाचे बजेट कोलमडते.
पुढील काही दिवसांत खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात होणार आहे. दुसरीकडे आता फळबागा आणि उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढली आहे. परंतु, खत खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना इतर उत्पादने घेण्यासाठी खत विक्रेते सक्ती करत असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. परिणामी खतविक्रेते व शेतकरी यांच्या नाराज येत असून खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग खताचा वापरला जाणारा प्रयोग बंद करावा अशी मागणी खत विक्रेते व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लिंकिंगच्या समस्येमुळे शेतकरी आणि विक्रेते दोघेही त्रस्त असल्याचे कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक संघटनेने म्हटले आहे. या समस्येविर- ोधात मागील वर्षी दोन दिवसांचा बंदही पुकारण्यात आला होता. या बंदचा काहीच परिणाम झाला नाही. खरिप हंगाम सुरू होणार असल्याने शासनाने लक्ष घालावे.