Sand Smuggler : गोंदीच्या वाळू तस्करावर स्थानबध्दतेची कारवाई

छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरनगर हद्दीतून घेतले ताब्यात; एक वर्षासाठी स्थानबध्द
Sand Smuggler
Sand Smuggler : गोंदीच्या वाळू तस्करावर स्थानबध्दतेची कारवाईfile photo
Published on
Updated on

Action taken against sand smuggler in Gondi

अंबड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोंदी येथील पंकज सखाराम सोळुंके याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये जालना जिल्हा पोलीस अधीक्षक पथक व गोंदी पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन त्यायला शनिवार (.१३) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर हद्दीतून ताब्यात घेतले. त्यायच्याणवर एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

Sand Smuggler
Sambhajinagar News : लाचखोरी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह अंमलदार ACBच्या जाळ्यात

याबाबत गोंदी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वाळू तस्कर प्रकरणातील आरोपी पंकज सोळुंके (गोंदी) यांच्यावर वाळू चोरी, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांना मारहाण करून दुखापत करणे, शिवीगाळ करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून कट रचून खुनाचा प्रयत्न करणे, अवैध वाळूची तस्करी करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, सार्वजनिक रस्त्यामध्ये सर्वसामान्यांना अडवून मारण्याचे गुन्हे दाखल आहेत.

याशिवाय त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा वर्तमानात काही फरक पडत नसल्याने पंकज सोळुंके यांच्या विरुद्ध स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ मार्फत पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास जालना जिल्हाधिकार्याबनी २ जानेवारी २०२६ रोजी मंजुरी दिली होती. तेव्हापासून गोंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार व पोलीस कर्मचारी सदरील वाळू तस्करांच्या मागावर होते. शनिवार (१३) जून रोजी पथकाने संयुक्तिकरित्या आरोपी सोळुंकेची माहिती काढून त्यास पोलीस ठाणे जवाहर नगर छत्रपती संभाजी नगर शहर हद्दीतून सापळा रचून ताब्यात घेतले.

Sand Smuggler
Gevrai Cattle Rescue | गेवराईत 14 गोवंशीय जनावरांची सुटका; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक तेगबीर सिंह सिंधू, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिक्षकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक हरी जंगले, सहाय्यक फौजदा फुलचंद हजारे, जिल्हा पोलीस अधीक्षक जालना पथकाचे सपोनी अविनाश गडाख, बरडे, जमादार कोकणे, पोलिस कर्मचारी जी.एम. हरबक, एन.टी. बकाल, व्ही. के. हळदे, व्ही. एम. बोराडे, सागर बाविस्कर, संदीप मांटे यांनी केली. पंकज सोळुंके यास एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोंदी पोलिसां मार्फत दाखल स्थानबद्ध करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news