

Action taken against 388 vehicles during blockade; Fine of Rs 3.5 lakh recovered
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासह दुय्यम अधिकारी व पोलिस अंमलदारांनी ७ ऑगस्ट रोजी केलेल्या प्रभावी नाकांबदी दरम्यान ३८८ वाहनचालकांवर कारवाई करून ३ लाख ४९ हजार २५० रुपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल व अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात नाकाबंदीच्या संचना दिल्या होत्या. नाकाबंदी दरम्यान जालना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचेसह दुय्यम अधिकारी व पोलिस अंमलदारांनी ठिकठिकाणी प्रभावी नाकांबदी केली.
त्यात वाहनावर नंबरप्लेट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सिट वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनवर बोलणे, काचांवर काळया फिल्मचा वापर, यासह वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करुन ३ लाख ४९ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दारू पिऊन धोकादायकरीत्या वाहन चालविणाऱ्या ०८ वाहन चालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
आगामी काळातसुध्दा विशेष नाकाबंदी मोहिम राबवण्यिात येणार असून, वाहनावर नंबरप्लेट न लावणे, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसिट वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनवर बोलणे, वाहनांच्या काचांवर काळया फिल्मचा वापर करणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे याविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. नकाबंदी दरम्यान दारु पिऊन धोकादायकरित्या वाहन चालविणाऱ्या ०८ वाहन चालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही मोहिम सुरु ठेवण्यात येणार असल्याने वाहन चालकांनी वाहतुक निमयमांचे पालन करावे असे अवाहन पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी केले आहे.