

Action against traffic violations; Helmets mandatory from March 1
जालना, पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा व पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2026 पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेत विना नंबर प्लेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म यांसारख्या प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
दरम्यान, 1 मार्च 2026 पासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार असून, विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर कडक दंड ठोठावला जाणार आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे व नियमभंग टाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.